आमचा प्रवास पण अगदी साधा सोपा सुरू झाला जसा सर्वांचा 12 वी नंतर होतो . हा प्रवास सुरु झाला तो ऍडमिशन पासुन तर "कोरोना बॅच" म्हणून ओळख मिळेपर्यंत. सर्वजण नवीन , पण तरी ऍडमिशन च्या वेळेस तोंडओळख झाली , मित्र म्हणून जवळीक झाली आणि भाऊ म्हणून नाती निर्माण झाली. आम्ही आहोत औषधनिर्माण शास्त्र (B.Pharmacy) पदवी शिक्षण पूर्ण केलेले 2022 बॅचचे विद्यार्थी 😊.
मी गेलो तो माझा पहिला दिवस इतरांचा 4,5 वा दिवस असणार . कॅम्पस तसा भरपूर मोठा होता पण आमच्याशी अजुन परिचित नव्हता. सुरवात झाली एकदाची , तीपण Practical ने आणि ओळखी झाल्या त्या Self Intro ने. First Year सुरू झालं नवीन मित्रमैत्रिणी भेटले.आता classroom म्हटला की मग काय सुरुवात असल्यामुळे एकदम शांत सर्व तास नीट -नियमित पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस शांततेचा सूर बदलला आणि तो common off च्या स्वरूपात बाहेर आला. Lecture आणि Practical ला सर्वांनी मिळून ठरवायचं आणि मग बस जे व्हायचं ते ....
हा सर्व निर्णय ठरवण्याचा , Theory पार्ट झाला आणि दुसऱ्या दिवशी सर्व सामोरे जातील ते मग practical त्यात सर्व गोष्टी आल्या रागावणं(Punishment) वैगरे बाकी तुम्ही समजु शकतात. सर्वांना शिक्षकांकडून रागावणं मिळाल्यामुळे हळूहळू ती सवय बंद झाली आणि सर्व कस सुरळीत चालू झाल होत. आता अभ्यासाची चाहुल लागली होती कारण sessional exam पुढे आली होती . झाला मग गोंधळ सुरू ह्या नोट्स काढ, ते बुक वाच, ते revise कर , exam च्या आधी एक शब्द नेहमी कानावर यायचा बघु रे पेपर आधी एक night अभ्यास करून विषय निघुन जातील. खरच काही जण एका रात्रीत अभ्यास करून विषय निघुन जायचे . Exam संपल्या मग आता इतर कार्यक्रमांची सुरुवात Day Celebration,gathering यांना सुरुवात........
अभी तो journey शुरू हुई है.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा