प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात,आता जोर लागत होता
कुणास ठाऊक हा शांत झंझावात, काय स्वरूप घेणार होता ।
अपयशाने खचत होतो,मनाने ही अशांत होतो
पण मन सांभाळत वादळांना, सामोरे जायला शिकत होतो ।
ध्येय सोडावे , प्रयत्न सोडावे, असा विचार होतो
पण ध्येयवेडा तोच जो त्या परिस्थितीला सांभाळुन घेतो ।
ध्येयाचा पाठलाग , आता प्रयत्न करत होते
कारण ध्येय साध्य करावे हे स्वप्न उराशी होते ।
शेवटी एकच
वाचावे शिवचरित्र जेव्हा, अंगावर जसा शहारा येतो
त्यांचे विचार लक्षात घेता, मनातला विचार बोथट होतो ।
Keep Reading........
Next post will come soon....😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा