शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

ध्येय आणि प्रयत्न

                     "ध्येय आणि प्रयत्न "  या दोन गोष्टींमुळे माणसाच जीवन पालटू शकत.  अनेकदा ध्येयाचा पाठलाग करताना अपयश येत आणि त्या वेळेस खचुन न जाता ते, ध्येय का ठरवलं ? याचा विचार करायचा. जर अधिकच निराश झालात तर मग फक्त आपल्या आईवडिलांच्या कष्टाचा विचार करा अंगात नवीन उर्मी आल्याशिवाय राहणार नाही.
    

     प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात,आता जोर लागत होता
  कुणास ठाऊक हा शांत झंझावात, काय स्वरूप घेणार होता ।

     
        अपयशाने खचत होतो,मनाने ही अशांत होतो
  पण मन सांभाळत वादळांना, सामोरे जायला शिकत होतो ।

  
      ध्येय सोडावे , प्रयत्न सोडावे, असा विचार होतो
   पण ध्येयवेडा तोच जो त्या परिस्थितीला सांभाळुन घेतो ।

 
          ध्येयाचा पाठलाग , आता प्रयत्न करत होते
         कारण ध्येय साध्य करावे हे स्वप्न उराशी होते ।

 
      शेवटी एकच
       
    वाचावे शिवचरित्र जेव्हा, अंगावर जसा शहारा येतो
  त्यांचे विचार लक्षात घेता, मनातला विचार बोथट होतो ।
    
                
Keep Reading........
Next post will come soon....😊

   
    
      
      

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

एक ओळख

         
             आमचा प्रवास पण अगदी साधा सोपा सुरू झाला जसा सर्वांचा 12 वी नंतर होतो . हा प्रवास सुरु झाला तो ऍडमिशन पासुन तर "कोरोना बॅच" म्हणून ओळख मिळेपर्यंत. सर्वजण नवीन , पण तरी ऍडमिशन च्या वेळेस तोंडओळख झाली , मित्र म्हणून  जवळीक झाली आणि भाऊ म्हणून नाती निर्माण झाली. आम्ही आहोत औषधनिर्माण शास्त्र (B.Pharmacy) पदवी शिक्षण पूर्ण केलेले 2022 बॅचचे विद्यार्थी 😊. 
            मी गेलो तो माझा पहिला दिवस इतरांचा 4,5 वा दिवस  असणार . कॅम्पस तसा भरपूर मोठा होता पण आमच्याशी अजुन परिचित नव्हता. सुरवात झाली एकदाची , तीपण Practical ने आणि ओळखी झाल्या त्या Self Intro ने. First Year  सुरू झालं नवीन मित्रमैत्रिणी भेटले.आता classroom म्हटला की मग काय सुरुवात असल्यामुळे एकदम शांत सर्व तास नीट -नियमित  पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस शांततेचा सूर बदलला आणि तो common off च्या स्वरूपात बाहेर आला. Lecture आणि Practical ला सर्वांनी मिळून ठरवायचं आणि मग बस जे व्हायचं ते ....
           हा सर्व निर्णय ठरवण्याचा , Theory  पार्ट झाला आणि दुसऱ्या दिवशी सर्व  सामोरे जातील ते मग practical  त्यात सर्व गोष्टी आल्या  रागावणं(Punishment) वैगरे बाकी तुम्ही समजु शकतात. सर्वांना शिक्षकांकडून रागावणं मिळाल्यामुळे हळूहळू ती सवय बंद झाली आणि सर्व कस सुरळीत चालू झाल होत. आता अभ्यासाची चाहुल लागली होती कारण sessional exam पुढे आली होती . झाला मग गोंधळ सुरू ह्या नोट्स काढ, ते बुक वाच, ते revise कर , exam च्या आधी एक शब्द नेहमी कानावर यायचा बघु रे पेपर आधी एक night  अभ्यास करून विषय निघुन जातील. खरच काही जण एका रात्रीत अभ्यास करून विषय निघुन जायचे . Exam  संपल्या मग आता इतर कार्यक्रमांची सुरुवात Day Celebration,gathering यांना सुरुवात........


अभी तो  journey शुरू हुई है.......

Utkal Divas (Odisha Day): Honoring the Pride and Heritage of Odisha

 Utkal Divas (Odisha Day): Honoring the Pride and Heritage of Odisha On April 1st every year, the citizens of Odisha celebrate Utkal Divas, ...