शुक्रवार, ३० जून, २०२३

बाप

              
              बाप ,वडील,बाबा  हे शब्द मनात ऊर्जा भरणारे असतात . नक्कीच प्रत्येकाचे स्वप्न , ईच्छा वेगवेगळ्या असल्या पाहिजेत पण त्या बाबांच्या मनाविरुद्ध नसल्या पाहिजेत. प्रत्येकाचे बाबा त्यांचा Best  देण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी मिळेल ती कामे करून कुटुंबाची सर्व स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत असतात.  तारुण्य वयात काहींना बाबांच्या बोलण्याचा राग येतो ,बाबा इतके शिस्तप्रिय का , का मनासारखे जगू देत नाही असे प्रश्न हमखास पडतात. 
               बाप आपल्या ईच्छा बोलुन नाही दाखवत खचलो ना तरी पाठी मागे असा ढाल बनुन उभा राहतो आणि मग वाटतं की संकट कितीही  येवोत आम्हाला भीती नाही .  बाबा आपले अपूर्ण स्वप्न मुलांमध्ये पाहण्याचं प्रयत्न करत असतात. आपल्या अपूर्ण स्वप्नांचा ते कधी विचारच करत नाही हा पण एक विचार नक्की करतात की मी माझ्या मुलांसाठी कुठे कमी नको पडायला. असं म्हणतात की बाबांना म्हणजेच घरातील मुख्य व्यक्तीला रडण्याचा अधिकार नसतो म्हणून काय बाबा त्यांच्या महत्वकांक्षा उफाळुन बाहेर येऊ देत नाही. कदाचित याच कारणामुळे   बाबांना दुसरा पर्यायी शब्द  SACRIFICE वापरलेला असेल. भविष्याची चिंता करत जे त्यांचा आज गमावून मुलांचा विचार करत आहेत कदाचीत ते जो विचार करत आहेत ते पूर्णत्वास येईल की नाही हेही माहीत नाही तरी त्यांच सर्वस्व ते कुटुंबासाठी देत आहे यापेक्षा धैर्यवान व्यतिमत्व कोणत असु शकत?
               बाप आपल्याला काही मोठ्या गोष्टी सांगत नाही सर्व काही गोष्टी हो म्हणतो कधी तरी समजावतो पण तर त्या वेळेस आपण समजून जायला हवं की मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी आपल्याला वाट दाखवणारा दुसर कोणी नाही तर बाप आहे. सर्व ईच्छा  व्यक्त होतात असे नाही काही ईच्छा आपण पण समजून घ्यायला हव्यात .कारण बाप खरच आपल्या ईच्छा कधी बोलून दाखवत नाही.

एक series सुरू करायचा विचार चाललाय म्हणजे पुस्तकच म्हणा "प्रवास" जर तुमचा प्रतिसाद असेल तर सुरू करूयात होकार असल्यास नक्की comment box मध्ये कळवा.

धन्यवाद🙏🏻🙏🏻

Utkal Divas (Odisha Day): Honoring the Pride and Heritage of Odisha

 Utkal Divas (Odisha Day): Honoring the Pride and Heritage of Odisha On April 1st every year, the citizens of Odisha celebrate Utkal Divas, ...