बालपण आणि आई
लहान असतांना , शाळेत नव्हतो जात
आईचा पाठीवरून फिरत होता , मायाळु हात ।
रागावले की ,बसुन राहणे ते ओट्यावर
घरात यायचे ते बाबा आल्यावर ।
त्यावेळी समज नव्हती , राग काय असतो
तरीही तेव्हा उशीत , तोंड खुपसुन बसतो ।
आईजवळ पुन्हा कशासाठी तरी रडायचे
हट्ट का असेना पण ते पूर्ण व्हायचे ।
आईसाठी आपण काय लिहायचे
आईच तर शिकवते , जगात उभे राहायचे ।
(आईसाठी शेवटी एकच म्हणने
आईचे आभार कसे मानावे, कळत नाही मला
आई सर्व आयुष्य आपल्यासाठीच वेचते हे आज कळतंय मला)
Wait till Next.......
☺️
- प्रशांत महाजन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा