सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

बाबा

                          बाबा



आयुष्याच्या जगण्यात, बाबा आपल्याला कधी कळतच नाही ।
कारण , बाबा
त्यांचे  अश्रु कधीच दिसू देत नाही ।

बाबांचे कष्ट ,आयुष्यभर पूर्ण होत नाही ।
परिवाराच्या आकांक्षा कधी , अपूर्णही राहू देत नाही।

आयुष्याचा संपूर्ण सार पाहिला 
तर तो बाबांच्या कष्टात दिसतो ।
कितीही असू द्या थकलेले ,
पण चेहरा मात्र सदैव हसरा दिसतो । 

असतात अपेक्षा बाबांच्याही , पण हरलो तरी साथ देतात ।
कुणास ठाऊक कणखर मनोबल , कसं करून घेतात ।

भविष्याचे विचार ,  बाबांच्या मनात  असतात ।
पोरांना आपल्यासारखे कष्ट नको , याचा विचार करत बसतात |

खचलो तरी धीर देत , पाठीमागे उभा असतो।
नाही जास्त पण थोडा , विश्रांतीवर बाबांचाही हक्क असतो।

(बाबा, वडिल , Dad, Papa  काहीही म्हणा पण या सर्वांचा   अर्थ एकच तो म्हणजे आधार )
        
                                                          
                                                          - प्रशांत महाजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Utkal Divas (Odisha Day): Honoring the Pride and Heritage of Odisha

 Utkal Divas (Odisha Day): Honoring the Pride and Heritage of Odisha On April 1st every year, the citizens of Odisha celebrate Utkal Divas, ...